दिलासा : सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी एकाही कोरोना रूग्णाची नोंद नाही

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुधवारी एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला नाही. आज सहाजणांना उपचारानंतर सोडण्यात आले असून आजवर कोरोनावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या 95 झाली आहे. तर 108 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज एकूण 120 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 24 अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 2978 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 2954 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 214 आहेत तर 2740 निगेटिव्ह आहेत. आज एक जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा 12 झाला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!