धाराशिव साखर कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज, मिल रोलरचे पूजन
उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखाना युनिट १ च्या नवव्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन कारखान्याचे संचालक दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील होते.
उस्मानाबाद जिल्हयात यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागण झाली असून यंदा पाऊसाचे प्रमाण सगळीकडे चांगले आहे. या २०२०-२१ च्या हंगामात कारखाने लवकर सुरू करण्याचे शासनाचे धोरण असणार आहे. त्यामुळे कारखान्याची गळीत हंगाम पूर्व कामे पूर्ण झालेली आहेत. ह्या हंगामात उच्चांकी गाळप करण्याचा मानस आहे.
कोरोनाच्या दिवसामध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करून कारखान्यातील कामे पूर्ण करण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यासाठी केलेले काम कौतुकास्पद असे चेअरमन अभिजित पाटील म्हणाले.
यावेळी कार्तिक पाटील, धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खारे, रामभाऊ रांखुडे, संदीप खारे, दीपक आदमिले, जनरल मॅनेजर हनुमंत पाटील, चिफ इंजिनीअर कोळगे, चिफ केमिस्ट तांबारे, शेती अधिकारी खामकर व कर्मचारी उपस्थित होते.