नीरा खोरे : पाऊस मंदावला मात्र भाटघरचे दरवाजे उघडल्याने वीरचा विसर्ग वाढला..नद्या भरून वाहत राहणार
पंढरपूर – नीरा खोरे परिसरात पाऊस मंदावला असून मागील चोवीस तासात किरकोळ स्वरुपाचे पर्जन्यमान नोंदले गेले आहे. भाटघर धरणातून ११ हजार ५०० क्युसेक पाणी वीरमध्ये सोडल्याने वीरचे दरवाजे उघडण्यात आले आहेत १८ हजार क्युसेक पाणी नीरा पात्रात सोडले जात आहेत. यामुळे नीरा व पुढे भीमा नद्या भरून वाहणे सुरूच राहिल.
नीरा खोर्यातील गुंजवणी धरण ९६.९९ %, देवघर ९३.१९, भाटघर १००, वीर १०० , नाझरे १०० टक्के भरले आहे. मागील चोवीस तासात गुंजवणी ४९ मि.मी., देवघर ३५, भाटघर १४ मि.मी, पाऊस झाला आहे. भाटघर १०० टक्के भरल्याने यातून ११५०० क्युसेक पाणी वीरकडे सोडले जात आहे. यामुळे वीरमधून पाणी सोडले जात आहे. सकाळी येथून १० हजार क्युसेकचा विसर्ग होता तो सकाळी आठ वाजता वाढविण्यात आला.