पंढरपूरकरांना दिलासा, २१ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

पंढरपूर – शहर व तालुक्यातील २१ जणांचे स्वँबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.याचा अहवाल आला असून ते सर्व निगेटिव्ह आहेत.अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. पंढरपूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
शहर व तालुक्यात आजवर कोरोनाचे ८ रुग्ण आढळले असून ७ जण उपचारानंतर घरी गेले आहेत. १ जण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.
परजिल्हा व परराज्यातून येण्याची परवानगी मिळाल्यानंतर पंढरपूर शहर व तालुक्यात अनेकजण दाखल झाले आहेत. त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. तसेच ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसतात त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. अशाच २१ जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!