पंढरपूरकरांना रविवारी दिलासा अन् सोमवारी चिंता, सकाळी ५ कोरोना रुग्ण वाढले
आजवर येथे ३५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. यापैकी आठ रूग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे तर २७ अॅटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. आजवर आढळलेल्या ३५ पॉझिटिव्ह रूग्णात पंढरपूर शहर व तालुक्यातील २९ तर मुंबई, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे.
आज जे पाच रूग्ण आढळले आहेत यातील एक
पंढरपूर शहरातील नवी पेठ येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेली व्यक्ती आहेत. दुसरी व्यक्ती पुणे येथे काम करीत असलेला कर्मचारी असून सध्या पंढरपूरमध्ये एका मठात विलगीकरणात ठेवण्यात आलेला आहे.
करकंबमध्ये जे २ कोरोनाबाधित आढळले आहेत यात एकजण पंढरपूरमध्ये शासकीय कार्यालयातील संगणक आँपरेटर आहे तर दुसरा करकंब येथील परंतु पंढरपूरमधील एका खासगी लॅबमध्ये काम करणारा व्यक्ती आहे.
पाचवा व्यक्ती सिकंदर टाकळी (मोहोळ) येथील असून लक्षणे आढळल्याने पंढरपूरमध्ये उपचारासाठी आला होता. तो संगर्गजन्य रुग्णालय कॉटेज येथे उपचार घेत होता.