पंढरपूरकरांना रविवारी दिलासा अन् सोमवारी चिंता, सकाळी ५ कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – रविवारी ५ जुलै रोजी कोरोनाचे ५३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पंढरपूरकरांना दिलासा मिळाला होता मात्र सोमवारी सकाळी नव्याने आलेल्या १२ जणांच्या अहवालात तालुक्यातील ५ जण पाँझिटिव्ह असल्याचे समजले. आता येथील अँक्टिव्ह रूग्णांची संख्या २७ इतकी झाली आहे.सोमवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहर २ ,करकंब २ व टाकळी सिकंदर १ असे रूग्ण आढळून आले आहेत. तीन दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील १८८ व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणी घेण्यात आले असून १२४ अहवाल प्रलंबित होते. यातील ५३ जणांचे अहवाल रविवारी ५ जुलै रोजी प्राप्त झाले ते सर्व निगेटिव्ह होते. दरम्या सोमवारी सकाळपर्यंत१२४ पैकी ७७ अहवाल प्राप्त झाले आहेत यात ६५ निगेटिव्ह, ५ पाँझिटिव्ह, ७ जणांचे स्वँब सँपल हे पूअर क्वालिटीचे असल्याने त्यांचे परत सँपल घ्यावे लागणार आहेत. तर अद्याप ४७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आजवर येथे ३५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. यापैकी आठ रूग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे तर २७ अ‍ॅटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. आजवर आढळलेल्या ३५ पॉझिटिव्ह रूग्णात पंढरपूर शहर व तालुक्यातील २९ तर मुंबई, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे.

आज जे पाच रूग्ण आढळले आहेत यातील एक
पंढरपूर शहरातील नवी पेठ येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेली व्यक्ती आहेत. दुसरी व्यक्ती पुणे येथे काम करीत असलेला कर्मचारी असून सध्या पंढरपूरमध्ये एका मठात विलगीकरणात ठेवण्यात आलेला आहे.

करकंबमध्ये जे २ कोरोनाबाधित आढळले आहेत यात एकजण पंढरपूरमध्ये शासकीय कार्यालयातील संगणक आँपरेटर आहे तर दुसरा करकंब येथील परंतु पंढरपूरमधील एका खासगी लॅबमध्ये काम करणारा व्यक्ती आहे.
पाचवा व्यक्ती सिकंदर टाकळी (मोहोळ) येथील असून लक्षणे आढळल्याने पंढरपूरमध्ये उपचारासाठी आला होता. तो संगर्गजन्य रुग्णालय कॉटेज येथे उपचार घेत होता.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!