पंढरपूरची पोटनिवडणूक पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची, जिल्ह्यासह राज्यातील नेत्यांकडून हालचाली सुरू
प्रशांत आराध्ये
कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी व त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जावी असा ही मतप्रवाह मतदारसंघात आहे. मात्र यास विरोधी पक्ष मान्य होणार का? हा खरा प्रश्न आहे. 2019 ला मतदारांनी कै. भारत भालके यांना चांगल्या मताधिक्क्याने विजयी केले होते. त्यांचा हा कौल पाच वर्षांसाठी होता. मात्र एकच वर्षात भारत भालके यांचे निधन झाले आहे. आता या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. येत्या तीन चार दिवसात सर्वच राजकीय पक्षांकडून येथील उमेदवार निश्चित केले जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने आरोग्य विषयक सारे नियम पाळून प्रचार करावा लागणार असल्याने राजकीय पक्ष प्रचाराला पुसा वेळ म्हणून लवकरच उमेदवारांची नावे जाहीर करतील याची शक्यता जास्त आहे.