पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

पंढरपूर,- कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 30 सप्टेंबरपर्यंतच बंदच असणार आहे. असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. राज्य सरकारने लाँकडाऊन 30 सप्टेंबर पर्यंत वाढविला आहे. या कालावधीत धार्मिक स्थळ बंद राहणार आहेत. यामुळे पंढरपूर चे मंदिर बंद राहणार आहे.
कोरोनामुळे श्री विठ्ठल मंदिर हे १७ मार्चपासून गेली साडेपाच महिने भाविकांना दर्शनासाठी बंदच आहे. मात्र सर्व नित्योपचार परंपरेप्रमाणे सुरू आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन आँनलाइन घेण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!