पंढरपूरच्या नागरिकांना 5 डिसेंबरपासून रोज सकाळी 6 ते 7 यावेळेत मिळणार विठ्ठलाचे दर्शन
पंढरपूर – श्री विठ्ठल रखुमाईचे मुखदर्शन आता 5 डिसेंबरपासून पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना रोज सकाळी 6 ते 7 यावेळेत घेता येणार आहे. यासाठी आँनलाइन बुकिंगची गरज नसून केवळ पंढरपूरमधील रहिवाशी असल्याचा पुरावा (आधार अथवा मतदान आळखपत्र)आवश्यक आहे.
कोरोनामुळे मंदिर 17 मार्च ते 15 नोव्हेंबर पर्यंत बंद होते. राज्य सरकारने 16 नोव्हेंबर दिवाळी पाडव्यापासून मंदिर उघडण्याचे आदेश दिले होते. पंढरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदस्पर्श दर्शन बंद असून भाविकांना श्रींचे मुखदर्शन दिले जात आहे. रोज 3 हजार भाविक दर्शन घेवू शकतात. यासाठी आँनलाइन बुकिंग आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांनी ही दर्शनासाठी आग्रह धरला आहे.
पंढरपूरच्या नागरिकांना 5 डिसेंबर पासून रोज सकाळी 6 ते 7 या वेळेत विठ्ठल रखुमाईचे दर्शन आता मिळणार आहे. याबाबत मंदिरे समितीने कळविले असून प्रसिद्धीपत्रकात भाविकांच्या दर्शनवेळेची माहिती देण्यात आली आहे. ( सोबत प्रसिध्दीपत्रक )