पंढरपूर – येथील प्रधानमंत्री आवास योजनेवरील स्थगिती उठविण्यात आली असून सोमवारी 8 ,मार्च रोजी याची सोडत आँनलाइन पध्दतीने काढण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली.
पंतप्रधान आवास योजनेतून 2 हजार घरं गरीबांसाठी बांधली जात असून यातील 892 घरांची कामे झाली आहेत. ही योजना पूररेषेत असल्याची तक्रार आल्यानंतर या योजनेस शासनाने स्यगिती दिली होती. कालच विधानपरिषदेत यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान गरीबांच्या घरयोजनेची स्थगिती उठविल्याबद्दल नगराध्यक्षांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रशांत परिचारक यांचे आभार मानले.