पंढरपूरमध्ये एक दिवस संचारबंदी वाढविली

पंढरपूर– कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पंढरपूर शहरात ७ ते १३ आँगस्ट दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात आज १ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.दिनांक १३आँगस्ट मध्यरात्री ते १४ आँगस्ट मध्यरात्री पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. यापूर्वीच्या आदेशाने १३ तारखेपर्यंत संचारबंदी होती. मागील सात दिवसात ३ हजाराहून अधिक रँपिड टेस्ट प्रशासनाने घेतल्या आहेत. यात ७०० हून अधिक रूग्ण सापडले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!