पंढरपूरमध्ये सहा ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल; 180 बेडची क्षमता विकसित : प्रांतधिकारी ढोले

पंढरपूर, दि.5: कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर शहरातील सहा हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. या पैकी उपजिल्हा रुग्णालयासह सहा हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असून त्यांची बेडची संख्या 180 आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विठ्ठल हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर विकसित करण्यात आले आहे.

पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये संपर्क शोधणे, तपासणी व उपचार करणे तसेच संस्थात्मक क्वारंटाइन करणे यावर भर देण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची व्यापक प्रमाणात रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत, असे श्री. ढोले यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील लाईफलाइन, गॅलेक्सी, गणपती, जनकल्याण, विठ्ठल,ॲपेक्स व उपजिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल तसेच विठ्ठल हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हॉस्पिटल म्हणून सुरु करण्यात आली आहेत. तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी रोहन व निष्कर्ष पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येणार आहे. यादोन्ही खासगी लॅबना तपासणीसाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचेही श्री.ढोले यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले असून, या पथकामार्फत नागरिकांची तपासणी व जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मेडिकल असोशिएनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्या मार्फत गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरणारी इंजेक्शनची उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. संचारबंधीच्या कालावधीत नारिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास ता्त्काळ तपासणी करुन घ्यावी. जेणेकरुन बाधितांचे वेळेत निदान करणे शक्य होईल, असे आवाहनही श्री.ढोले यांनी केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!