पंढरपूर :आज प्राप्त अहवाल ४१ ; निगेटिव्ह ३२ , पाँझिटिव्ह ९..घरी सोडले ६, एकूण बाधित संख्या ६४

पंढरपूर – सोमवारी रात्री शहरात ८ व तालुक्यातील रोपळे येथे १ असे ९ पाँझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ६४ झाली. आज ६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आजवर येथून २९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३३ जणांवर उपचार सुरू आहेत.२ जण मयत आहेत.

दरम्यान आज संतपेठ भागातील ३५ जणांची रँपिड अँटिजेन चाचणी घेण्यात आली, याचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ही दिलासादायक बाब आहे.

एमआयटी वाखरी येथे एकूण ८० जणांची रँपिड अँटिजेन टेस्ट झाली असून यात २ जण पाँझिटिव्ह आढळले आहेत. असे आजच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!