पंढरपूर ग्रामीणमध्ये कोरोना फैलावतोय, तालुका 3146 रुग्णसंख्येसह जिल्ह्यात आघाडीवर ; आजवर एकूण मृत्यू 65
पंढरपूर- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे पंढरपूर तालुक्यात आढळून आले असून येथे आजवर 3146 जणांची नोंद आहे. तर तालुक्यात आजवर या आजाराने 65 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सोमवारच्या अहवालानुसार सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात शहरातील तीन व ग्रामीणमधील तीन जणांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय पसरले असून सोमवार 7 सप्टेंबरच्या अहवालानुसार 82 रूग्ण ग्रामीण भागातील आहेत तर शहरातील 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहेत. शहरात आतापर्यंत 1749 तर ग्रामीण भागात 1397 रूग्ण आढळून आले आहेत. सुरूवातीला पंढरपूरसह उपरी व करकंबमध्ये रूग्ण आढळून आले होते. मात्र नंतर हळूहळू शहरात ही संख्या खूप वाढली होती. मात्र आता कोरोनाने ग्रामीण भाग ही व्यापत आणला आहे. आतापर्यंत शहरात कोरोनामुळे 38 तर ग्रामीण भागात 27 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सोमवारी 7 सप्टेंबरच्या अहवालानुसार सहा जण मयत आहेत. हा सर्वाधिक आकडा आहे. आतापर्यंत शहरातील 1267 तर ग्रामीणमधील 931 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरातील 444 तर ग्रामीणमधील 439 जणांना उपचार सुरू आहेत.
पंढरपूरमध्ये कोविड केअर सेंटरबरोबरच उपजिल्हा रूग्णालय तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सुरूवातीला पंढरपूर हे कोरोनापासून सुरक्षित मानले जात होते मात्र आता येथे ग्रामीणमधील सर्वाधिक रूग्ण आहेत. जिल्ह्यातील अन्य भागांचा विचार केला तर पंढरपूरच्या पाठोपाठ बार्शी तालुका 2696 रूग्ण आहेत तर माळशिरसमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत असून तेथे 1793 कोरोनाबाधित आकडा झाला आहे. माढा 1275, दक्षिण सोलापूर 1083, करमाळा 873, सांगोला 758, मोहोळ 691, उत्तर सोलापूर 559 तर मंगळवेढा 574 रूग्ण आढळून आले आहेत.दक्षिण व उत्तर सोलापूरसह अक्कलकोट मधील रूग्ण संख्या ही झपाट्याने कमी होवू लागली आहे.