पंढरपूर तालुका: एकूण 5758 जण कोरोनामुक्त , 495 रूग्णांवर उपचार सुरू

पंढरपूर- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोनाबाधित हे पंढरपूर तालुक्यात आढळून आले असून रविवार 8 नोव्हेंबरपर्यंत येथील एकूण रूग्णसंख्या ही 6 हजार 446 इतकी झाली आहे. रविवारी 24 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दरम्यान जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक मृत्यू ही याच तालुक्यात 193 नोंदले गेले आहेत.
रविवार 8 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 6 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 18 असे 24 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 446 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 1 जण मयत आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 193 झाली आहे. सध्या एकूण 495 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5758 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात तालुकानिहाय रूग्णसंख्येची आकडेवारी पाहिली तर पंढरपूर तालुका अग्रेसर आहे. यापाठोपाठ बार्शी 5852 व माळशिरस 5616 या तालुक्यांचा क्रमांक लागतो. पंढरपूर तालुक्यात कोरोनामुळे येथे आजवर 193 मृत्यू नोंदले गेले आहेत. तालुक्याचा कोरोनामुळे मृत्यूदर हा 2.99 टक्के इतका आहे. शहर व तालुक्यात या रोगातून बरे झालेल्यांची संख्या 5758 इतकी असून याची टक्केवारी 93.26 इतकी आहे. अद्याप ही 495 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
पंढरपूर तालुक्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या ग्रामीण भागात आहे. आजवर ग्रामीणमध्ये 3592 रूग्ण आढळून आले असून 104 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत तर 3178 जण कोरोनावर मात करून घरी गेले असून सध्या 310 जणांवर उपचार सुरू आहेत. तर पंढरपूर शहरात आतापर्यंत 2854 रूग्ण आढळून आले आहेत यापैकी 89 जणांचा मृत्यू झाला तर 2580 जण उपचारानंतर कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत. सध्या शहरातील 185 जणांवर उपचार सुरू आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!