पंढरपूर – गेलै काही दिवस ज्या पावसाची प्रतीक्षा होती त्याने पंढरपूर तालुक्यात दमदार हजेरी लावली असून शनिवारी रात्रौ ते रविवारी सकाळपर्यंत सरासरा 37.77 मिलीमीटरची नोंद आहे. पंढरपूर शहरात 64 मि.मी. पाऊस झाला असून अद्याप रिपरिप सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी साठले आहे.
ग्रामीण मध्ये पावसाचा जोर असल्याने ओढे व नाल्यात पाणी वाढू लागले आहे. ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील यांना दक्षता घेण्याची सूचना देण्यात येत आहे नाले, ओढे, कासाळ ओढा ओढा या लगत असणार्या लोकांनी पाण्याचा अंदाज घेत सुरक्षित स्थळी जावे…..सहकार्य लागल्यास प्रशासनास कळवावे ,असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. नदी पात्रात पुराची लगेच शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे।
पंढरपुर तालुका आज दि.
27/06/2021 रोजीचे पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.