पंढरपूर पोटनिवडणूकः एकमेव महिला उमेदवार शैला गोडसे यांचा प्रचार सुरू, सर्वसामान्यांचे प्रश्‍न आणतायेत ऐरणीवर

पंढरपूर- पंढरपर विधानसभा पोटनिवडणुकीत एकमेव महिला उमेदवार असणार्‍या अपक्ष शैला गोडसे यांनी आपला प्रचार सुरू केला असून रांझणी गावातून यास प्रारंभ करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे त्या विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी करत होत्या. त्यांना या निवडणुकीत उतरण्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडावे लागले आहे. मात्र त्याची तमा न बाळगता त्यांनी येथे आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. प्रचारात त्या कारखानदारांकडून शेतकरी, कामगारांच्या होणार्‍या आर्थिक पिळवणुकीचा मुद्दा जनतेसमोर मांडत आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादीकडून या मुख्य राजकीय पक्षांकडून दिलेले उमेदवार हे साखर कारखानदार आहेत. त्यांनी शेतकर्‍यांच्या उसाचे पैसे दिलेले नाहीत. आपण या शेतकरी व कामगारांना न्याय देण्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे शैला गोडसे यांनी सांगितले.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक गेली 12 वर्ष मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या उपसा सिंचन योजनेच्या प्रश्‍नावर लढविली जात आहे. हा प्रश्‍न व्यवस्थित शासन दरबारी मांडून सोडविणे शक्य असले तरी तो चुकीच्या पद्धतीने मांडून लाभार्थी गावातील शेतकरी, नागरिकांची दिशाभूल केली गेल्याने हक्काच्या पाण्यापासून नागरिक वंचित आहेत, असे गोडसे म्हणाल्या.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!