पंढरपूर – पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील राज्य, जिल्हा, इतर जिल्हा मार्ग तसेच राज्य हद्दमधील रस्त्यांची सुधारणा करणे, पूल बांधकाम व रस्ते दुरूस्तीच्या कामासाठी 21 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
अर्थसंकल्प अधिवेशन 2021-2022 पूर्वी परिचारक यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या या निधीची मागणी केली होती. त्यानुसार पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात साखर कारखान्यांच्या उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने येथे रस्त्यांची दुरवस्था होते. हे पाहता रस्ते बांधणी व दुरूस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती.
बांधकाम विभागाने मंजूर मार्ग व निधी पुढील प्रमाणे ः मंगळवेढा- पाटखळ- गोणेवाडी- शिरसी रस्त्यावर लहाण पूल बांधणे (एक कोटी रूपये ), मंगळवेढा- पारे- जत- विळूर रस्ता सुधारणा करणे (दोन कोटी रू), खर्डी-तावशी -एकलासपूर- नेपतगांव रस्ता सुधारणा करणे (1 कोटी 50 लाख), गुंजेगांव-आंधळगाव- पाटखळ- नंदेश्वर- भोसे- हुन्नुर ते राज्य हद्द रस्ता पुलाचे बांधकाम व रस्त्याची सुधारणो (1 कोटी 50 लाख), घेरडी-हुन्नुर-मारोळे रस्ता दुरूस्ती (1 कोटी 50 लाख), खर्डी-तावशी- एकलासपूर रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे (2 कोटी), गुंजेगांव- आंधळगांव- पाटखळ- नंदेश्वर- भोसे- हुन्नुर ते राज्य हद्द रस्ता 391 सुधारणा करणे (4 कोटी रू.), धर्मगांव- मल्लेवाडी- घरनिकी- मारापूर- लक्ष्मी दहिवडी रस्ता सुधारणा करणे (4 कोटी रू.) प्रजिमा 72 ते महमदाबाद- लोणार-पडोळकरवाडी रस्ता दुरूस्ती (3 कोटी 50 लाख).