२०१९ च्या निवडणुकीत समाधान आवताडे यांच्या मतांची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत वाढली ,तर अन्य उमेदवारांची घटली
आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक केंव्हाही जाहीर होवू शकते. यासाठी सर्वच गटांची तयारी आहे. मागील दोन निवडणुकात जिद्दीने लढणा उद्योजक समाधान आवताडे या निवडणुकीत उतरणार हे निश्चित आहे. मागील दोन निवणुकांचा विचार केला तर त्यांच्या मतांची टक्केवारी वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवेढ्यात त्यांचा राजकीय पाया भक्कम आहे , त्यांना आता ताकदीने पंढरपूर भागात आपले पाय रोवावे लागणार आहेत हे निश्चित.