पंढरपूर मतदारसंघात 7 हजार 414 नवमतदार

पंढरपूर –  पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 328 मतदान केंद्र असून यापैकी पाच संवेदनाशील आहेत. येथे 3 लाख 32 हजार 860 मतदार येेथे आपला मतदानाचा हक्क बजाविणार असून यापैकी  7 हजार 414 नवमतदार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते. या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील चोवीस गावे समाविष्ठ असून येथील मतदारसंख्या ही 1 लाख 54 हजार 575 तर मंगळवेढ्याच्या 81 गावंमध्ये 1 लाख 78 हजार 285 मतदार आहेत. यात पुरूष मतदारांची संखया ही 1 लाख 73 हजार 527 तर महिला मतदार 1 लाख 59 हजार 330 आहेत. या मतदारसंघात नवमतदारांची संख्या ही 7414 इतकी आहे. मतदारसंघात 1616 दिव्यांग मतदार असून त्यांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वाहनांची सोय यासह मतदान केंद्रात रॅम्प तसेच व्हील चेअरची सोय करण्यात येत आहे. या मतदारसंघात एकूण 3 तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे.
पंढरपूर मतदारसंघात 5 संवेदनाशील केंद्र असून यापैकी तीन पंढरपूर शहरात तर एक कासेगाव व अन्य मंगळवेढा शहरातील आहे. मतदानकेंद्रात कर्मचार्‍यांन सोयी सुविधा देण्यात येत आहेत. याच बरोबर मतदानादिवशी येथे पाण्याची सोय ही असणार आहे. कर्मचार्‍यांची ने आण करण्यासाठी 58 एसटी बसेस तैनात केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार दहा टक्के मतदान केंद्रांची म्हणजे 32 ठिकाणचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. मतदानादिवशी जवळपास 2 हजार कर्मचारी तैनात केले जात असल्याने सचिन ढोले यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!