पंढरपूर विभागात कोरोना रुग्णसेवा व मदत कार्यासाठी शिवसेनेची समिती स्थापन

पंढरपूर – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचनेवरून कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी पंढरपूर विभागात शिवसेनेने एक समिती स्थापन केली आहे.

यात साईनाथ अभंगराव (अध्यक्ष),धनंजय डिकोळे (उपाध्यक्ष),संभाजीराजे शिंदे (सचिव),महावीर देशमुख(कार्यध्यक्ष),सूर्यकांत घाडगे(समन्वयक) तर सदस्य म्हणून स्वप्निल वाघमारे, दत्ता पवार,सुधीर अभंगराव,भरतभाऊ आवताडे,सचिन बागल,मधुकर देशमुख,नामदेव वाघमारे,सुधाकर लावंड,आशाताई टोणपे,गणेश इंगळे यांचा समावेश आहे

शिवसेनेचे उपनेते, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी पंढरपुर विभागातील पंढरपूर,सांगोला,माळशिरस,माढा,करमाळा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर येथे नुकतीच बैठक घेतली होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या भागातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी एक समिती स्थापन करण्याची सूचना आ. सावंत यांनी केली होती.  

पंढरपूर उपविभागा अंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार्‍या अडचणी,ऑक्सिजन,रेमिडेसिवीरचा पुरवठा,बेडची उपलब्धता,महात्मा फुले जनआरोग्य योजने सारख्या योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणे,शासनाच्या नियमानुसार कोरोना रुग्णावर उपचाराचे दहा दिवसाचे बिल जास्तीत जास्त 57 हजार रुपये आकारण्यात येते का नाही याची पाहणी करणे. कोरोनाबाधितांना आवश्यक असलेले औषधे रास्त दरात उपलब्ध करुन देणे, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नावाचा फलक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावणे,शासनाने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून जाहीर केलेले अन्नधान्य वाटप सुरळीतपणे होते की नाही याची दक्षता घेणे, राज्य सरकारने जाहीर केलेले 1500 रुपयांचे अर्थसहाय पात्र रिक्षा चालक व बांधकाम कामगार यांना मिळाले पाहिजे यासाठी पाठपुरावा करणे. तसेच वेळोवेळी नागिरकांकडून प्राप्त होणार्‍या तक्ररीचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करणे आदी जबाबदारी या समितीच्या माध्यमातून पार पाडली जाणार असल्याची माहिती शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी दिली आहे.                       

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!