पंढरपूर शहर व तालुक्यात 30 रूग्ण वाढले, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 118
पंढरपूर – आज गुरुवारी 16 जुलै रोजी पंढरपूर शहरात 23 तर ग्रामीणमध्ये 7 असे एकूण 30 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 118 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
264,अहवाल प्राप्त असून निगेटिव्ह 234 तर पाँझिटिव्ह 30 आहेत. शहरात 23 तर कान्हापुरी गावात 5 तर भोसे व एकलासपूरमध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे. आज 10 जणांना डिसचार्ज देण्यात आला असून 77 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. आजवर 39 जण बरे झाले आहेत. तर 2 जण मयत आहेत
आज रँपिड अन्टिजेन 263 टेस्ट घेण्यात आल्या आहेत तर 1 आरटीपीसीआर टेस्ट झाली.
आजवर पंढरपूर शहरात 82, ग्रामीणमध्ये 28 तर इतर तालुके व जिल्हयातील 8 रूग्ण आढळले आहेत.