पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकीच्या वतीने शुक्रवारी १२ वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सेमिनार
पंढरपूर – कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने *१२ वी नंतर पुढे काय?* तसेच व्यवसायिक शिक्षणासाठी पाञता, शिष्यवृत्ती व लागणारे कागदपत्रे याविषयी शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन फेसबुक लाइव्ह आणि यूट्युब लाइव्ह च्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती १२ वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
१२ वी चा निकाल बोर्डाच्या वेबसाईट जाहीर झाला असून १२ वी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुढे कोणते शिक्षण घ्यायचे. याबाबत संभ्रम अवस्था असते.यामुळे अनेक विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने १२ वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाञता, शिक्षणासाठी शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती आणि प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे या विषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम हे उद्या शुक्रवार दि. १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पद्धतीने आपल्या घरी राहून फेसबुक लाइव्ह किंवा युट्यूबलाइव्ह च्या माध्यमातून देणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना याविषयी माहिती घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी ११ वाजता यूट्यूबलाइव्ह लिंक https://youtu.be/RCzZSeO71-U तसेच
फेसबुक लाईव्ह लिंक https://www.facebook.com/sinhgad.pandharpur/posts/3085398701556216 इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. या संदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास प्रा. सोमनाथ कोळी 8378017546 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.