अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी सामंजस्य करार
पंढरपूर – कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आणि पदार्थविज्ञान-इलेक्ट्रिकल विभाग एम.एस. युनिव्हर्सिटी, बडोदा, गुजरात यांच्यामध्ये संशोधनासाठी सामजंस्य करार झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय व एम.एस. युनिव्हर्सिटी, बडोदा, गुजरात, पदार्थविज्ञान-इलेक्ट्रिकल विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने हा संशोधन सामजंस्य करार करण्यात आला आहे.
या संशोधन सामजंस्य करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळणार आहे. तसेच संशोधनासाठी शिक्षकांची, विद्यार्थ्यांची देवाण-घेवाण होणार असून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या करारामुळे संशोधन अनुदान प्रस्ताव वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीला एकत्रित सादर करणे, एकत्रित शोधनिबंध प्रकाशित करणे, वर्कशॉप आणि कॉन्फरन्स इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विद्यार्थी व शिक्षक यांची गुणवत्ता वाढीसाठी हा संशोधन सामजंस्य करार महत्वपूर्ण ठरणार आहे.
गुजरात मधील एम. एस. युनिव्हर्सिटी, बडोदा व पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यातील हा संशोधन सामजंस्य करार पाच वर्षासाठी करण्यात आला आहे. हा संशोधन सामजंस्य कराराच्या दरम्यान एम. एस. युनिव्हर्सिटी येथील संशोधक डॉ. चेतन पांचाल व पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील डॉ. संपत देशमुख यांनी प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.
हा करार यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिल निकम, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. राजश्री बाडगे, प्रा. समीर कटेकर, प्रा. सुधा सुरवसे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. नामदेव सावंत यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.