पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावी सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश
पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
पंढरपूर: सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, पंढरपूरचा १२ वी सीबीएसई बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवणार्या येथील बारावीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.
सिंहगड पब्लिक स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्न करत असुन १२ वीच्या परीक्षेत निकिता मोरे ९२.४ % प्रथम , द्वितीय क्रमांक आदित्य वाघमारे ८९.४ % तर तृतीय क्रमांक निशिता पाटील ८८.२ % गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे चैतन्य शेळके व निशिता पाटील यांनी इंग्रजी विषयात ९५ गुण, वैभवी भांगे हिने गणित विषयात ८५ गुण, आदित्य वाघमारे याने भौतिकशास्त्र विषयात ९५ गुण, सौरभ भोसले, निकिता मोरे, सुभान शेख यांनी रसायनशास्त्र विषयात ९५ गुण, शारीरिकशिक्षण विषयात सनन बेद्रेकर याने ९७ गुण, जिवशास्त्र विषयात निकिता मोरे ९७ गुण, तर माहिती तंत्रज्ञान विषयात सुभान शेख याने ९३ गुण मिळवून यश संपादन केले आहे. पंढरपूर सिंहगडच्या उत्कृष्ट शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंहगड संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. आशा बोकील, पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कँम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर सह कॅम्पस मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.