पंढरीतील मठ व धर्मशाळांमध्ये बाहेरील व्यक्तिंना वास्तव्यास बंदी
पंढरपूर.दि.2- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मठ आणि धर्मशाळेमध्ये बाहेरील वारकरी वास्तव्यास असता कामा नये. जर विनापरवाना कोणी राहात असेल तर संबंधित मठ चालक आणि धर्मशाळा यांनी तत्काळ प्रशासनास तशी माहिती कळवावी. असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी आवश्यकतेनुसार निर्देश पारित होतील. मात्र तत्पूर्वी पंढरपूर शहराची काळजी घेण्याच्या दृष्टीने येथील मठामध्ये अथवा धर्मशाळांमध्ये विनापरवाना बाहेरील नागरिक जर येत असतील तर याची माहिती प्रशासनास मठ चालकांनी कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी मठाचे व्यवस्थापक आणि धर्मशाळा चालक यांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपुरातील 450 हून अधिक मठ आणि धर्मशाळा यांना नोटिसा बजावल्या आहेत. यात राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातून येणार्या नागरिक, साधकांना पोलीस व महसूल प्रशासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय वास्तव्यास ठेवू नये. सध्या जे लोक यात वास्तव्यास आहेत त्यांची नावे संकलित करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकार्यांनी दिल्या असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच मठ व धर्मशाळांमध्ये विनापरवानगी कोणी वास्तव्यास आढळून आल्यास त्यांचावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमा अंतर्गत कारवाई करण्यात येईल. असा इशारा प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिला आहे.