पंढरीत मोरया प्रतिष्ठानच्या शिबिरात 91 तरूणांचे रक्तदान

पंढरपूर– शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून वारकरी संप्रदाय पाईक संघ व मोरया प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित शिबिरात 91 जणांनी रक्तदान केले.
याचे नियोजन केवळ एकाच दिवसात ज्ञानेश कवठेकर मित्रपरिवाराने केले होते. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा पाहता शासनाकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले जात आहे. यास प्रतिसाद 91 तरूण रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला.
यावेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष राणा महाराज वासकर, चैतन्य महाराज देहूकर, रामकृष्ण वीर महाराज, शिवभक्त प्रतिष्ठानचे सौरभ थिटे पाटील, प्रतापराव साळुंखे, मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश कवठेकर, मार्गदर्शक नंदकुमार कुलकर्णी उपस्थित होते. या शिबिरास युवा नेते प्रणव परिचारक, भागवत बडवे, नीलराज डोंबे, ओंकार जोशी व मित्रपरिवार यांनी भेट दिली. याप्रसंगी शतकवीर रक्तदाते सदानंद सुपेकर यांचा सत्कार करण्यात आला.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!