पत्रकार सन्मान योजनेचा १० कोटींचा मंजूर निधी त्वरित वितरीत होणार

मुंबई- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या निधीच्या मुद्यावर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ कार्यकारिणीची उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री  अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीवरून या योजनेसाठी मुदत ठेवीत आणखी १० कोटी रुपये देण्याची घोषणा मागील अर्थसंल्पात व अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. अद्याप वित्त विभागाने ही रक्कम पत्रकार कल्याण निधीला वर्ग केलेली नाही. ही बाब अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी हा निधी त्वरित वर्ग करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सन्मान योजनेसाठी अधिकचा निधी मिळणार आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!