पालखी सोहळा पत्रकार संघाच्या फेसबुक पेजवर ५ ऑगस्ट पासून संत जीवन चरित्र कथन माला

अकलूज – वेळापूर येथील श्री आनंदमूर्ती सेवा मंडळ व महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमी , श्री संत ज्ञानेश्वर महाराज जयंती व प. पू.सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते ( नाशिक ) यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार दि . ५ ते १२ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ५ या दरम्यान ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर राज्यातील नामवंत संत साहित्याचे अभ्यासक संतांचे जीवन चरित्र कथन करणार आहेत .

बुधवार दि. ५ रोजी संत निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्थ जयंत महाराज गोसावी – संत निवृत्तीनाथ , गुरुवार दि . ६ रोजी सासवडच्या संत साहित्याच्या श्रीमती सत्यवती एदलाबादकर – संत सोपानदेव , शुक्रवार दि . ७ रोजी मुक्ताईनगरचे संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे – संत मुक्ताबाई , शनिवार दि . ८ रोजी श्री क्षेत्र पैठणचे संत एकनाथ महाराज यांचे १२ वे वंशज योगेश महाराज गोसावी – संत एकनाथ , रविवार दि . ९ रोजी श्री क्षेत्र पंढरपूरचे संत साहित्याचे अभ्यासक प्र . द . निकते – संत नामदेव , सोमवार दि . १० रोजी श्री क्षेत्र वेळापूरचे संत साहित्याचे अभ्यासक स्वामीराज महाराज भिसे – संत तुकाराम , मंगळवार दिं ११ रोजी श्री क्षेत्र केजचे संत साहित्याचे अभ्यासक समाधान महाराज शर्मा – संत ज्ञानदेव व बुधवार दि . १२ रोजी अकलूजचे संत साहित्याचे अभ्यासक प्रमोद महाराज भास्करे – प पू सदगुरु श्री गजानन महाराज गुप्ते ( नाशिक ) यांचे जीवन चरित्र कथन करणार आहेत . भाविकांनी या चरित्र कथनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री आनंदमूर्ती सेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी केले आहे .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!