पुण्यातील नगरसेवकाकडून पंढरपूरमधील 500 गरजू कुटुंबाना तीन लाख रू. धान्य वितरण ; स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक


पंढरपूर– कोरोनामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून पंढरीत अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. याची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज घाटे यांनी येथील 500 गरजू कुटुंबाना धान्य पाठवून दिले. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते याचे वितरण करण्यात आले.
घाटे कुटुंब हे मूळचे पंढरपूरचे असून नगरसेवक धीरज घाटे अनेक वर्षापासून पुणे येथे स्थायिक झाले आहेत. त्यांचे पुणे परिसरात मोठे सामाजिक कार्य असून या जोरावर ते नगरसेवक झाले आहेत. दरम्यान पंढरीतील त्यांचे चुलत भाऊ अवधूत घाटे यांनी येथील परिस्थितीची माहिती धीरज घाटे यांना कळवली होती. पंढरपूरचे अर्थचक्र वारीवर फिरत असून मागील सव्वा वर्षात पाचही यात्रा कोरोनामुळे झाल्या नाहीत. याचा मोठा फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसला आहे. याची दखल घेवून घाटे यांनी जवळपास तीन लाख रूपयांचा किराणा माल येथे पाठवून दिला आहे. याचे वितरण प्रांताधिकारी ढोले यांच्या हस्ते समस्त उत्पात समाजाच्या उपासना मंदिर येथून करण्यात आले. ढोले यांनी देखील धीरज घाटे यांची पंढरीशी नाळ जुळली असल्याने त्यांनी येथे मदत पाठवली असल्याचे गौरवोद्गार काढले.
घाटे यांनी पुणे येथे मोइे कोविड रूग्णालय सुरू केले असून आपल्या भागात ते औषधांसह जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वितरण ते करत आहेत. तसेच पंढरपूर येथील अनेक रूग्णांना पुणे येथील रूग्णालयात बेड मिळवून देण्याचे मोठे काम घाटे यांच्यामार्फत सुरू आहे.
दरम्यान सदर धान्य वाटप प्रसंगी माजी नगरसेवक शैलेश बडवे, ऋषिकेश उत्पात, श्रीकांत हरिदास, भागवत महाजन, ओंकार जोशी, महेश काळे, कैवल्य उत्पात, रोहित पुरंदरे उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!