पंढरपूर – शुक्रवार ४ डिसेंबर रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा संपन्न झाली. कार्तिकी यात्रा आता संपली श्रींचे राजोपचार या पूजेने सुरू झाले आहेत. यात्रा कालावधीत देवाचा पलंग काढला जातो व श्री भक्तांना दर्शन देण्यासाठी २४ तास उभे असतात. आता प्रक्षाळपूजेने सर्व राजोपचार सुरू झाले आहेत.
आज यानिमित्त मंदिरे समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची तर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली. यावेळी मंदिरात 3 टन विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी झेंडू, आँर्केट, गुलाब, कारनेशन, आष्टर, शेवंती, अँथेरियम, काकडा, तुळशी, आवळा, चाफा, कामिनी, ग्लायडिओ, जुई, तगर, कण्हेर, निशिगंध, अशोकाची पाने व फुले तसेच पायनापल व मोसंबी फळांपासून १० ते १५ रंगसंगती वापरून आरास करण्यात आली.
ही आरास मंदिर समिती कर्मचाऱ्यांनी केली असून यासाठी राजूशेठ मोहिते, निव्रुत्ती मोहिते, अभिजित मोहिते, राहुल ताम्हाणे, राजेंद्र नाईक व अमोल शेरे या पुण्याच्या भाविकांनी फुले पुरविली आहेत.