प्रार्थनास्थळ भाविकांना खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपाचा घंटानाद
पंढरपूर– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ॲनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मॉल, मद्य दुकाने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला मात्र मंदिर व प्रार्थनास्थळबंद ठेवली आहेत. हे योग्य नाही जनभावनेचा विचार करून तातडीने ती खुली करावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अन्य राज्यांमध्ये मागील महिन्यात प्रार्थनास्थळ खुली करण्यात आली आहेत मात्र महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला नाही. यासाठीच भाजपाने शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन केल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले.
राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन आज केले जात आहे. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरासमोर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सकाळी करण्यात आले. बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. याच बरोबर सोलापूर व अन्य तालुक्यांमध्ये ही भाजपाने घंटानाद आंदोलन केल्याचे वृत्त आहे.
बार्शी येथे आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.सोलापूरमध्ये काळजापूर मारूती मंदिरासमोर भाजपाने घंटानाद केला.अक्कलकोट येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.