नवी दिल्ली – बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रभारी म्हणून बुधवार 30 सप्टेंबर रोजी अधिकृत निवड केली असून याबाबतचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या स्वाक्षरीने प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ही नियुक्ती झाल्याबद्दल फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देताना या जबाबदारीमुळे आम्हाला शिकायला मिळेल असे सांगत बिहारची निवडणूक एनडीए जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक नेत्यांन बिहारमध्ये निवडणुकीची तयारी केली आहे. राज्यात पंतप्रधान मोदींबद्दल मोठे प्रेम आहे तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या विकासात्मक कामामुळे ही निवडणूक आम्ही जिंकू असे ते म्हणाले.
दरम्यान महाराष्ट्र मागील वर्षी विधानसभेची निवडणूक फडणवीस यांच्याच नेतृत्वखाली लढली गेली होती. भाजपा व शिवेसनेना सहज यश मिळविले मात्र निवडणूक निकालानंतर युती तुटली व राज्यात दोन्ही काँग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. महाराष्ट्रात फडणवीस यांनी चांगले काम केले आहे. मात्र शिवसेनेशी निवडणूकपूर्व युती करून सत्तास्थापनेपेक्षा जास्त संख्याबळ असून ही निकालानंतर वाद निर्माण झाल्याने महाराष्ट्रात भाजपचा पुन्हा मुख्यमंत्री होवू शकला नाही. आता भारतीय जनता पक्षाने फडणवीस यांना बिहारची जबाबदारी सोपवून त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविला आहे.