बुधवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 352 रूग्ण वाढले ,एकूण संख्या 25 हजार पार
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) बुधवारी 30 सप्टेंबर रोजी एकूण 352 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माढा तालुक्यात 75 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 461 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25024 इतकी झाली असून यापैकी 18069 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6276 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 461 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 679 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 72 रूग्ण वाढले
पंढरपूर – बुधवारी 30 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 26 व तालुक्यात 46 असे 72 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 854 झाली आहे. . आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 118 झाली आहे.एकूण 705 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4031 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .