पंढरपूर – बुधवार 31 मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) 344 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारच्या अहवालानुसार सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 108 यापाठोपाठ पंढरपूर तालुका 49, करमाळा 45, माळशिरस 43 तर माढा तालुक्यात 38 ची नोंद आहे. आजच्या अहवालानुसार जे चार मृत्यू नोंदले गेले आहेत. यात बार्शी तालुक्यात दोन तर मोहोळ व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. दिवसात एकूण 5 हजार 888 चाचण्या झाल्या असून यापैकी 5544 निगेटिव्ह आहेत तर 344 पॉझिटिव्ह आहेत. 146 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये 45 हजार 649 कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी 1233 जणांचा या आजारात मृत्यू झाला आहे तर 41 हजार 182 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3 हजार 234 जणांवर उपचार सुरू आहेत.
सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8 हजार 902 इतके आढळून आले असून यापैकी 249 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 हजार 255 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 398 जणांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी पंढरपूर शहरात 19 तर ग्रामीणमध्ये 30 कोरोना रूग्णांची नोंद आहे.