बुधवारी पंढरपूर तालुक्यात 74 रुग्ण वाढले, एकूण संख्या 1901
पंढरपूर – बुधवारी 19 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 74 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
आजच्या अहवालानुसार तालुक्यात 55 तर शहरात 19 रूग्ण वाढले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1901 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण मरण पावले आहेत. यामुळे कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 35 झाली आहे. 1050 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 816 जणांनी कोरोनावर मात केली आहे.