बुधवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 65 कोरोना रूग्ण आढळले

पंढरपूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसत असून बुधवार 24 फेब्रुवारी रोजी आलेल्या अहवालानुसार 65 रूग्ण आढळून आले आहेत. आजवर ग्रामीणमध्ये 40 हजार 332 रूग्ण सापडले असून 1177 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 410 जण उपचार घेत असून 38 हजार 745 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
बुधवारी आलेल्या अहवालानुसार 65 रूग्ण एकाच दिवशी आढळून आले असून सर्वाधिक दक्षिण सोलापूर तालुक्यात 28 आहेत. यापाठोपाठ बार्शी 9, माळशिरस 8 तर पंढरपूर तालुक्यात पाच कोरोनाबाधित आढळून आले आहेत. कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने आता प्रशासनाने काही निर्बंध ही लागू केले असून रात्र संचारबंदी लागू केली आहे.
दरम्यान पंढरपूर शहरात दोन तर तालुक्यात तीन रूग्णांची भर बुधवारी पडली असून येथील एकूण संख्या 8188 इतकी झाली आहे. सध्या 54 जणांवर केवळ उपचार सुरू आहेत. 7891 जण उपचार घेवून परत घरी गेले आहेत तर 243 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आजवर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण हे पंढरपूर तालुक्यातच आढळून आले आहेत.
बुधवारी जिल्हा ग्रामीणमधील 1728 जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 1663 निगेटिव्ह आहेत तर 65 पॉझिटिव्ह आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!