बुधवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 243 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – बुधवार 24 मार्च रोजी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिकाक्षेत्र वगळून ) 243 कोरोनाबाधित रूग्ण वाढले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 72, करमाळा 47 , माळशिरस 34 तर पंढरपूर तालुक्यात 32 आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार 4880 चाचण्या झाल्या असून यापैकी 4637 निगेटिव्ह तर 243 पॉझिटिव्ह आहेत. आज 84 जणांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. बुधवारच्या अहवालानुसार 2 जण कोरोनामुळे मयत असून यात 1 अक्कलकोट तर 1 माळशिरस तालुक्यातील रुग्णाचा समावेश आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 43 हजार 305 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून 1216 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. 40 हजार 326 जणांनी कोरोनावर मात केली असून 1763 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 8580 आढळून आले असून 247 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत तर 8114 जणांनी कोेरोनावर मात केली आहे. सध्या 219 जणांवर उपचार सुरू आहेत. आज शहरात 12 तर ग्रामीणमध्ये 20 कोरोनाबधित आढळून आले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!