बुधवारी सोलापूर जिल्ह्यात 249 कोरोना रूग्ण आढळले, जिल्हा ग्रामीणमध्ये दोन जणांचा मृत्यू

पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यात बुधवारी 249 कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून सोलापूर शहरात 138 तर जिल्हा ग्रामीण भागात 111 जणांची आज नोंद आहे. दरम्यान ग्रामीणमध्ये दोन रूग्णांनी या आजारात प्राण गमावले आहेत.
बुधवारी आलेल्या अहवालानुसार सोलापूर शहरात 138 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून तेथील एकूण संख्या 13 हजार 409 इतकी झाली आहे. तर आजवर 677 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या 847 जणांवर उपचार सुरू असून 11 हजार 885 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी 2889 चाचण्या झाल्या असून यापैकी 2778 निगेटिव्ह आहेत तर 111 पॉझिटिव्ह आहेत. आजच्या अहवालानुसार 2 रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर बुधावरी 67 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हा ग्रामीणमध्ये आज सर्वाधिक रूग्ण माढा तालुक्यात 30 आढळले असून यापाठोपाठ माळशिरस 20, तर करमाळा व बार्शीत प्रत्येकी 17 रुग्ण सापडले आहेत. आजवर ग्रामीणमध्ये 41 हजार 950 रूग्ण नोंदले गेले असून यापेकी 1203 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 39 हजार 742 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या 1005 जणांना उपचार सुरू आहेत.
पंढरपूर तालुक्यात आजवर एकूण 8 हजार 420 रूग्ण आढळून आले असून 244 जणांनी या तालुक्यात कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या 160 जणांवर उपचार सुरू असून 8 हजार 016 जणांनी या तालुक्यात कोरोनावर मात केली आहे. आज पंढरपूर तालुक्यात 11 यात शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 8 जणांची नोंद आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!