भाजपासाठी महाराष्ट्रात आमदार फोडून सत्तापरिवर्तन करणे अशक्य : जयंत पाटील

पंढरपूर, – सध्याची महाराष्ट्रातील भाजपाची स्थिती व राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीत एकत्र असल्याने असणारी ताकद पाहिली तर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी जरी राजीनामा दिला व पुन्हा विधानसभा निवडणूक लढविली तरी ते विजयी होवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. यामुळे येथे अन्य राज्यांप्रमाणे भाजपाला दुसर्‍या पक्षांचे आमदार फोडून सत्तापरिवर्तन घडवून आणणे अशक्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांना मध्यप्रदेशमध्ये मार्च महिन्यात झालेले सत्तापरिवर्तन व सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसशासीत राज्यात उद्भवलेली स्थिती याबाबत प्रश्‍न विचारण्यात आला. यावर जयंत पाटील म्हणाले, अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात जर भाजपाने सत्तास्थापनेसाठी आमदार फोडाफोडीचे राजकारण केले तर त्यांची येथे डाळ शिजणे अशक्य आहे. कारण सत्ताधारी महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष सहभागी झाले आहेत. येथे आमदारांना राजीनामा देवून पक्ष बदलून नंतर निवडणूक लढवावी लागेल. अशावेळी तीन पक्षांचा विरोध या उमेदवारांना निवडणुकीत सहन करावा लागेल. यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. भाजपाने जर एकट्याने निवडणूक लढली तर राज्यात ते 105 नव्हे तर 60 ते 65 जागा ही जिंकू शकत नाहीत हे विधान शरद पवार साहेब यांनी जे विधान केले आहे ते अगदी बरोबर आहे , अशी पुष्टी पाटील यांनी यावेळी जोडली.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!