भीमा नीरा खोर्‍यात उजनी वगळता अन्य प्रकल्प उपयुक्त पातळीत

पंढरपूर – पावसाळा सुरू होताना सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी भीमा व नीरा खोर्‍यातील अन्य धरणं ही उपयुक्त पाणीसाठ्यात आहेत. दरम्यान जून महिन्याच्या आठ दिवसात अनेक धरणांवर चांगला पाऊस झाला आहे. सर्वाधिक पर्जन्यमान आंध्रा प्रकल्पावर 193 मिलीमीटर इतके नोंदले गेले आहे.
उन्हाळा हंगाम संपला असून आता मान्सून ही राज्यात सक्रिय झाला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून भीमा खोर्‍यात पावसाने हजेरी लावली आहे. भीमा व नीरा खोर्‍यातील धरणं ही उपयुक्त पाणी पातळीत असून केवळ उजनीचा प्रवास हा मृतसाठ्यातून उपयुक्त पातळीकडे अद्याप सुरू आहे. हे धरण बुधवारी सकाळी वजा 19.99 टक्के अशा स्थितीत होते.
भीमा खोर्‍यातील अन्य प्रकल्पांची स्थिती पुढील प्रमाणेः पिंपळगाव जोगे 0, माणिकडोह 4.08 टक्के, येडगाव 29.07, वडज 22.25, डिंभे 22.15, घोड 0.01, विसापूर 3.55, कलमोडी 6.82, चासकमान 11.51, भामा आसखेड 38.05, वडीवळे 20.83, आंध्रा 61.37, पवना 30.10, कासारसाई 44.08, मुळशी 5.21, टेमघर 9.36, वरसगाव 18.76, पानशेत 23.52, खडकसवासला 42.34 टक्के. नीरा खोरे ः गुंजवणी 34.55 टक्के, देवघर 10.45, भाटघर 6.40, वीर 47.59 तर नाझरे 18.24 टक्के.
जून महिन्याच्या सुरूवातीला भीमा खोर्‍यातील अनेक धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेला आहे. टेलएन्डच्या प्रकल्पांवर पर्जन्यराजाची कृपा असल्याचे दिसत आहे. यात घोड धरणावर 123 मि.मी., चासकमान 134, आंध्रा 193, वीर 103 मि.मी. अशी पावसाची नोंद आहे. अन्य प्रकल्पांवर ही पावसाची हजेरी असून ती पुढील प्रमाणेः पिंपळगाव जोगे 48, माणिकडोह 36, येडगाव 29, वडज 40, डिंभे 45, विसापूर 38, कलमोडी 26, भामा आसखेड 49, वडीवळे 42, पवना 80, कासारसाई 109, मुळशी 17, टेमघर 65, वरसगाव 70, पानशेत 72, खडकवासला 68 तर उजनी 37 मि.मी. नीरा खोरे ः गुंजवणी 66, देवघर 46, भाटघर 52, नाझरे 46 मि.मी.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!