भीमा नीरा खोर्यात पावसाची दमदार हजेरी
पंढरपूर – काही दिवसांपासून प्रतिक्षा असणार्या पावसाने मागील चोवीस तासात भीमा खोर्यात दमदार हजेरी लावली आहे. मुळशी धरणावर सर्वाधिक 134 मिलीमीटरची नोंद आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनीवर 9 मि.मी. पाऊस झाला असून हा प्रकल्प अद्याप वजा 16.72 टक्के अशा स्थिती आहे.
राज्यात मान्सून सर्वदूर बरसत होता मात्र भीमा व नीरा खोर्यातील धरणांवर त्याची दमदार एंट्री यंदा दिसत नव्हती. मात्र मागील चोवीस तासात बहुतांश धरणांवर पर्जन्यराजाची कृपा झाली आहे. शनिवार 19 जून ला सकाळपर्यंत अनेक धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेला असून यात टेमघर 110 मि.मी., पवना 102, वडीवळे 80, आंध्रा 78, कलमोडी 71, कासारसाई 64, पानशेत 56, वरसगाव 51,खडकवासला 45, पिंपळगाव जोगे 55, भामा आसखेडा 51, चासकमान 42 यासह घोड उपखोर्यात डिंभे 39, माणिकडोह 29, वडज 24, येडगाव 20, घोड 11 मि.मी. अशी पावसाची नोंद आहे.
नीरा खोर्यात देवघर 75, गुंजवणी 59, भाटघर 36, वीर 22 मि.मी. अशी पर्जन्याची नोंद आहे. दरम्यान उजनी धरण वगळता भीमा व नीरा खोर्यातील सर्व धरण उपयुक्त पातळीत भरत आहेत.
धरणांची स्थिती
उजनी
*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 19/06/2021 at 6.00 hrs
RWL —— 489.660 m.
Water Sp.Area —173. 49 Sq.km.
*-Storage-*
Gross ——- 1549.19 M Cum.
——– (54.70 TMC)
Live ——– -253.62 M Cum.
——— ( -8.96 TMC)
Live % ——– *-16.72 %*
Rainfall ( Today’s / Cumulative ) ——– 09/97 mm.
Evaporation ——– 4.38 mm.
*Outflow :-*
1) Sina Madha LIS -00 cusecs.
2) Dahigaon LIS – 00 Cusecs.
3) Tunnel – 00 cusecs.
4) Main Canal – 00 Cusecs.
5) Power House – 00 Cusecs.
6) Spillway — 00 Cusecs.
7) River Sluices — 00 Cusecs.