मंगळवारच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 20 रूग्ण वाढले
पंढरपूर – मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 11 व तालुक्यात 9 असे 20 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 566 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 52 आहे.एकूण 505 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2009 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .