मंगळवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 147 कोरोनाबाधितांची भर, दोनजण मयत
पंढरपूर- सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) मंगळवारी 16 मार्च रोजी 147 कोरोनाबाधितांची वाढ झाली असून सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 40 आढळून आले आहेत.
मंगळवारी आलेल्या अहवालानुसार 2758 चाचण्या झाल्या असून यापैकी 2611 निगेटिव्ह आहेत तर 147 पॉझिटिव्ह आहेत. आजच्या अहवालानुसार 2 रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 69 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान जिल्हा ग्रामीणमध्ये आज सर्वाधिक रूग्ण बार्शी तालुक्यात 40 आढळले असून यापाठोपाठ पंढरपूर तालुक्यात 28 रुग्णांची नोंद आहे.करमाळा 17 तर माढा व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी 18 रुग्ण सापडले आहेत. आजवर ग्रामीणमध्ये आजवर 41 हजार 839 रूग्ण नोंदले गेले असून यापेकी 1201 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 39 हजार 765 जणांनी या आजारावर मात केली आहे. सध्या 963 जणांना उपचार सुरू आहेत.
पंढरपूर तालुक्यात आजवर 8 हजार 409 रूग्ण आढळून आले असून 244 जणांनी या तालुक्यात कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. सध्या 161 जणांवर उपचार सुरू असून 8 हजार 004 जणांनी या तालुक्यात कोरोनावर मात केली आहे. आज पंढरपूर शहरात 14 तर तालुक्यातही 14 रुग्णांची नोंद आहे.