मंदिर बंद असण्याच्या कालावधीत भाविकोपयोगी योजना पूर्ण करण्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनास निर्देश

मुंबई – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुरातत्व विभाग व पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री एकवीरा देवी कार्ला, श्री लेण्याद्री जुन्नर ,श्री खंडोबा देवस्थान जेजुरी देवस्थान येथील विकास कामांचा आढावा घेतला. कोरोनामुळे मंदिरे बंद असण्याच्या कालावधीचा सदउपयोग करत भाविकांना सुखसोयीच्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना प्रशासनास केल्या.

पंढरपूरचा आराखडा १ महिन्यात पूर्ण करावा तर कार्ले येथे पायरी दुरुस्ती साठी ५० लाखांची तरतुद करण्याचे आदेश दिले. एकवीरा ,लेण्याद्री, पंढरपूर आणि आळंदी देवस्थानच्या विकासाच्या अनुषंगाने ९ सप्टेंबर २०१९ रोजी बैठक घेण्यात आली होती. या वेळी देण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला. यावेळी त्यांनी भाविकांना आवश्यक सुविधा देणेची जबाबदारी सर्वानी समन्वयाने पूर्ण करावी व देवस्थान विकासाचा आराखडा पूर्ण करावा असे निर्देश दिले. यावेळी केंद्र शासनाचे पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र यादव, श्री गर्ग संचालक महाराष्ट्र पुरातत्व विभाग, श्री. सुनील जोशी मुख्याधिकारी पंढरपूर देवस्थान,श्री मधुसुदन बर्गे तहसीलदार मावळ, श्री. हनुमंत कोळेकर तहसीलदार जुन्नर,श्री. अंकुश जाधव मुख्याधिकारी आळंदी नगरपालिका, श्री. वाहने सहायक संचालक पुरातत्व विभाग, आर्किटेकट्ट प्रदीप देशपांडे व आर्किटेक तेजस्विनी आफळे हे या बैठककीला हजर होते.
एकविरा देवस्थान मध्ये सप्टेंबर २०१९ मधील बैठकीमध्ये देण्यात आलेले निर्देशाप्रमाणे पुरातत्व विभागाने कामे सुरु केल्याचे सांगितले. यामध्ये भिंतीचे काम व स्वच्छतागृहे पूर्णत्वावरती आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पायऱ्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात येणार आहे असे डॉ. राजेंद्र यादव यांनी सांगितले. याठिकाणी रोप वे सुरू करणे व सुखसोयी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रोप वे चा प्रस्ताव करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर एकविरा देवी ठिकाणी सुद्धा रोपवे साठी ठिकाण व आवश्यक असणारी जागा शोधावी. याच्या प्रस्तावामध्ये रोप वेची सुरक्षा व देखभाल दुरुस्ती चा खर्च ही अंतर्भूत करावा व सुरक्षेसाठी आवश्यक त्या खबरदारी घ्याव्यात असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तहसीलदार मावळ श्री मधुसुदन बर्गे यांना दिले.
लेण्याद्री देवस्थानांमध्ये पिण्याच्या पाण्याचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच पायावरती विश्रांतीची जागा निश्चित करण्यात आलेली असून त्याची नियोजन ही ही करण्यात आलेले आहे मात्र अद्याप काम सुरू नसल्याचे अधीक्षक पुरातत्व विभाग डॉ. राजेंद्र यादव यांनी सांगितले. ग्रामस्थांची मागणी नुसार प्रवेश फी माफीचा प्रस्ताव सुद्धा महासंचालक नवी दिल्ली यांना सादर करण्यात आलेला आहे असे त्यांनी सांगितले. याठिकाणी असलेल्या शौचालय बांधकामाच्या जमिनी संदर्भातल्या वादामध्ये तहसीलदार जुन्नर यांनी ३१ ऑक्टोबर पूर्वी त्यांच्या स्तरावरील तक्रारींमध्ये निर्णय घ्यावा व त्यामध्ये मोजणी विभागाकडून मोजणी करण्यासंदर्भात निश्चित करावे. तसेच तहसीलदार यांनी लेण्याद्रीच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे किंवा कसे याचा शोध घ्यावा व शासनाचे विश्रामगृह बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना द्याव्यात असे निर्देश श्री हणमंत कोळेकर तहसीलदार, जुन्नर यांना दिले.
सप्टेंबर २०१९ मधील मीटिंग मधील निर्देशा नुसार पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान समितीने सविस्तर विकास आराखडा तयार करण्यासाठी आर्किटेक नेमला आहे व त्याला बारा लाख रुपये वर्ग करण्यात आलेली आहेत .नोव्हेंबर २०२० अखेर सदर विकास आराखड्याचे काम पूर्ण होईल असे श्री. विठ्ठल जोशी कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांनी सांगितले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंढरपूर मंदिरात गाभारा व ज्या ठिकाणी लोकांची गर्दी असते त्या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी उपाय योजनाचा समावेश या डीपी मध्ये करावा व नैसर्गिक प्रकाशासाठी आवश्यक उपाययोजना आराखड्यात समाविष्टकराव्यात असे निर्देश दिले. मंदिरामध्ये सौर उर्जेचा वापर करण्यासंदर्भात डीपीआर मध्ये तरतूद करावी असेही निर्देश दिले.
तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तीर्थक्षेत्र विकास आराखडा ८० टक्के पूर्ण झालेला असून भूसंपादनासाठी साडेतीन कोटी रुपये आवश्यक आहेत. पुणे महानगरपालिकेने आळंदी शहरासाठी दहा एम. एल. डी. पाणी देण्यासाठी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे नगरपालिका मुख्याधिकारी श्री अंकुश जाधव यांनी सांगितले. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन व कचरा उठाव यासंदर्भात योग्य प्रकारे नियोजन करावे, सर्व भाविकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवाव्यात असे सूचित केले. तसेच आळंदीतील शासनाच्या विश्रांती गृहाचे विस्तारीकरण करण्यासंदर्भात संबंधित विभागास मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी लेखी कळवावे. प्रत्येक सोमवारी दुपारी सर्व महिला नगरसेवक यांना त्यांच्या प्रश्नासाठी वेळ देऊन त्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्याधिकारी आळंदी यांना दिले.
जेजुरी देवस्थान विकास आराखडा राज्य पुरातत्व विभागाने तयार केलेला असून त्याचे सादरीकरण तेजस्वी आफळे यांनी सादर केले. श्री. तेजस गर्ग संचालक यांनी हा आराखडा संपूर्ण राज्यात एक मार्गदर्शक ठरावा अशा प्रकारची नियोजन केल्याचे सांगितले. या प्रकल्पामध्ये हळदी मुळे निर्माण होणाऱ्या या प्रदूषण कमी करण्यास नव्या तंत्रज्ञानाच्या ऊपयोगाच्या प्रस्तावाचे स्वागत केले व जेजुरी देवस्थान च्या विकासासाठी पुरातत्व विभागाने देवस्थान ला विश्वासात घेऊन ,तसेच भाविकांच्या श्रद्धांचा आदर करुन लवकरात लवकर विकास आराखडा सादर करावा असे निर्देश डॉ. गोऱ्हे यानी दिले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!