मंदिर बंद ; मात्र ॲप ,संकेतस्थळ, चॅनेलवरून भाविकांच्या सोयीसाठी विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन

पंढरपूर.दि.17: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत. याचाच भाग म्हणून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ही दर्शनासाठी बंद आहे. मात्र भाविकांना घरबसल्या विठ्ठठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेता येणार आहे. अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

श्री विठ्ठल-राक्मिणीचे मंदिर भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाचा, गुगल प्ले स्टोअरमधून shreevitthalrukmnilive Darshan ॲप डाऊनलोड करावे तसेच जिओ टीव्ही वरील जिओ दर्शन आणि टाटा स्काय डिशवरील अँक्टिव चॅनेल या माध्यमातून श्री.विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार पाहता येणार आहे.

01 जुलै 2020 रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आलेल्या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!