मनसेच्या वतीने गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
पंढरपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना महामारी संकटाला तोंड देत असताना गोरगरीबांना मदत करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असून या अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे सोलापूर जिल्हा मनसेच्या वतीने निराधार व गरीबांना एक महिना पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
अजनसोंड येथील निराधार, वृद्ध, गोरगरीबांना 1 महिना पुरेल एवढे गहू ,तांदूळ साखर, चहा पावडर, मास्क यांचे वितरण मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते व तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवाजीराजे पाटील, बाळासाहेब पाटील,समाधान शिरगिरे, रामा सुतार, समाधान दुबल,नीलेश घाडगे हे उपस्थित होते.
यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन दिलीप धोत्रे यांनी केले. नागरिकांनी घाबरून न जाता एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे असे आवाहन केले. तसेच कोणतीही अडचण असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी फोन वरून संपर्क साधावा. मनसेचे कार्यकर्ते आपल्याला मदत करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.