महाराष्ट्र सायबर विभागाकडून लॉकडाऊनच्या काळात २२७ गुन्हे दाखल, ४६ जणांना अटक

मुंबई दि. 17– कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात 227 गुन्हे दाखल केले आहेत.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या 227गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C )आहेत.
यामध्ये बीड २६, पुणे ग्रामीण १७, मुंबई १६, कोल्हापूर १५, जळगाव १३, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा ८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, , ठाणे शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ ,नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, रायगड २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १०४ गुन्हे दाखल झाले आहेत.तसेच आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ७५ गुन्हे ,titktok विडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ३९ गुन्हे दाखल झाले आहेत . आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे .यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात सायबर विभागाला यश आले आहे .

*मुंबई-लातूर*

मुंबईमधील आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे .सदर गुन्ह्यात आरोपी महिलेने आपल्या फेसबुक व ट्विटर प्रोफाईल वर सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात दोन धर्मात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल अशा आशयाच्या पोस्टस टाकल्या होत्या.
तसेच लातूर शहरांतर्गत औसा पोलीस स्टेशनमध्ये अन्य एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली, ज्यामुळे लातूर जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ५ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या टिकटॉक अकाउंटचा वापर करून कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात दोन धर्मात तेढ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल अशा आशयाचा धार्मिक रंग देणारा व्हिडीओ बनवून तो सोशल मिडियावर प्रसारित केला.

*नागरिकांना आवाहन*

सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसअँप मेसेजेस फिरत आहेत .या मेसेजेस मध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी,किंवा कोणत्याही वेबसेरीजचे subscription स्वस्तात आहे ,खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर असतो व एक लिंक दिली असते . आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये .कारण सदर लिंक्स व मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे . तुम्ही जर त्या लिंकवर क्लीक केले तर एक फॉर्म उघडतो ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स,पासवर्डस ,डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती ,पिन क्रमांक सर्व विचारले जाते . तुम्ही ही सर्व माहिती दिली कि, एक OTP येतो व तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो .पलीकडून संभाषण करणारी व्यक्ती आपण त्या कंपनीमधूनच बोलतोय असा आभास निर्माण करून तो OTP , तुमच्याकडून काढून घेते व काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा sms येतो कि तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे . त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये .तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी व www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website )पण नोंद करावी .असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!