महिला बचत गटांच्या कर्जमाफीसाठी कुर्डूवाडीत मनसेच्या नेतृत्वाखाली मोर्चा

कुर्डूवाडी – महिला बचत गटाचे कर्ज सरसकटमाफ करावे आणि या महिलांकडून विम्यासाठी जी रक्कम घेतली जाते याची पॉलिसी तातडीने मिळावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली कुर्डूवाडी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. यामुळे महिला बचत गटाचे काम ही लॉकडाऊनमधये बंद पडले. या गटांना विविध बँकांनी जी कर्ज दिली आहेत ती आता थकीत आहेत. यामुळे मायक्रो फायनान्सचे कर्मचारी कर्जवसुलीसाठी तगादा लावत असून महिलांना दमदाटी केली जात आहे. महिलांच्या घरातील साहित्य कर्मचारी घेऊन जात आहेत. हे सर्व प्रकार बंद करून सरकारने कर्ज माफ करावे अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

बचत गटाला कर्ज रक्कम मिळताना विमा म्हणून काही पैसे काढून घेतले जातात. आता या कोरोनाच्या वाईट परिस्थितीत तो विमा लागू करून महिलांचे कर्ज जमा करून त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देऊन ही महिला बचत गटाची चळवळ सुरू ठेवावी अशी मागणी मनसेने लावून धरली आहे. याबाबत मनसेचे दिलीप धोत्रे यांनी मागील चार महिन्यापासून अडचणीत आलेल्या या बचत गटाच्या महिलाना सवलत देण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
पक्षाचे अध्यक्ष राज ठाक यांना देखील या विषयाची माहिती देण्यात आली असून ते वरिष्ठ पातळीवर महिला बचत गटांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान कुर्डूवाडीतील आंदोलनावेळी शहराध्यक्षसागर बंदपट्टे, आकाश लांडे, सुभाष खटके, सागर लोकरे, सागर घोडके, अमोल लांडे आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!