माणची पाणी पातळी वाढली, नदी दुथडी भरून वाहतेय..
पंढरपूर – माण नदी परिसरात आटपाडी, म्हसवड, दिघंची यासह पंढरपूर भागात होत असलेल्या पावसाने या नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. यामुळे नदीकाठी ही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथील माण नदीवरील पुलाजवळ तालुका पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
पुलावर पाणी आल्याने पंढरपूर- मंगळवेढा रस्ता बंद
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पंढरपूर तालुक्यात कासाळगंगा ओढ्याच्या पाण्यामुळे पंढरपूर -सातारा व पंढरपूर -पुणे मार्गावर पाणी होते. पुणे रस्त्यावर भंडीशेगाव येथील पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान ही झाले आहे.
दरम्यान माण नदीची पाणी पातळी आता वाढत आहे. काही ठिकाणी बंधारे पाण्याखाली जाण्याची स्थिती आहे. ही नदी सरकोली जवळ भीमेला मिळते.